
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना क्षेत्रातील नागरिकांना अत्यल्प दरात सर्व सुविधा युक्त, वातानुकूलित आणि सुरक्षित शहर वाहतुक उपलब्ध व्हावे या उद्देशाने अकोला शहराचे खासदार अनुपजी धोत्रे, आमदार रणधीरजी सावरकर यांच्या अथक प्रयत्नाने प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई-बस सेवा योजने अंतर्गत अकोला शहराच्या पब्लीक ट्रांसपोर्टसाठी अकोला शहरात येणा-या 15 ऑगस्ट पासून 12 मीटर लांबीच्या 14 आणि 9 मीटर लांबीच्या 28 असे एकुण 42 ई-बस सेवा सुरू करण्याचा मानस होता. परंतू काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे जसे प्रशासकीय इमारत, कर्वशॅप परिसर, इलेक्ट्रीक सब स्टेशनचे कामे अद्याप पुर्ण नसून सदरचे काम अंतिम टप्प्यात असून येणा-या सप्टेंबर अखेर पर्यंत सदरचे काम पुर्णत्वास येण्याची शक्यता असून आता शहरात अकोला महानगरपालिकेचा स्थापना दिवस म्हणजेच 1 ऑक्टोंबर पासून अकोला शहरातील ई-बस सेवा सुरू करण्याचे मानस असल्याचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे