
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी अध्यक्ष व अधिकाऱ्यांसोबत जलजीवन मिशन, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि आरोग्य विषयांचा आढावा घेतला.
नव्या जिल्हा परिषद इमारतीसाठी दर्जेदार फर्निचर आवश्यक असल्याचे सांगतानाच शाळा दुरुस्तीसाठी डीपीडीसी व सीएसआरमधून निधी उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा निधी थेट जिल्हा परिषदेलाच वितरित करावा, तो आमदारांना देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच खासगी ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांची पडताळणी सक्तीची करण्याची मागणी करत विविध प्रशासकीय विषयांवरही भूमिका मांडली.
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्यासमवेत आज जिल्हा परिषद अंतर्गत विषयांवर चर्चा केली. बैठकीत जल जीवन मिशन, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची कमतरता, वर्गखोल्यांची दुरवस्था, कृषी, सिंचन, समाज कल्याण, शिक्षक समायोजन तसेच विविध विभागांतील मंजूर व प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या आवश्यक सूचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis