शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले - मेघना बोर्डीकर
परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले अशा शब्दात माजी राज्यपाल डी वाय पाटील यांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आपल्या शोक संदेशात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या,ज्येष्ठ शिक्ष
अ


परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले अशा शब्दात माजी राज्यपाल डी वाय पाटील यांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आपल्या शोक संदेशात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल तथा पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीला आयुष्य वाहणारे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.देशभरात शैक्षणिक संस्था उभारून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रातील योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande