
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वसमतनगर, जि. हिंगोली येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) योजना तसेच संस्था व्यवस्थापन समितीमार्फत नव्याने संलग्नता प्राप्त झालेल्या व्यवसायांसाठी शिल्प निदेशकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
या पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून नियुक्ती 11 महिन्यांच्या सेवा करारावर करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि कॉस्मेटोलॉजी या व्यवसायांसाठी शिल्प निदेशकांची पदे उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी व अनुभव, तीन वर्षांची इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा संबंधित पदविका व अनुभव अथवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमधील एनटीसी/एनएसी आणि संबंधित अनुभव आवश्यक आहे.
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीजीडीसीए तसेच संबंधित अनुभव किंवा COPA अथवा आयटीआय क्षेत्रातील संबंधित ट्रेडमधील एनटीसी/एनएसी आणि अनुभव आवश्यक आहे.
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा पदविका व संबंधित अनुभव अथवा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर ट्रेडमधील एनटीसी/एनएसी आणि अनुभव आवश्यक आहे.
कॉस्मेटोलॉजी पदासाठी संबंधित क्षेत्रातील पदवी, ब्युटी कल्चरल/कॉस्मेटोलॉजीमधील पदविका व अनुभव अथवा संबंधित ट्रेडमधील एनटीसी/एनएसी आणि अनुभव आवश्यक आहे.
सर्व पदांसाठी डीजीटी अंतर्गत नॅशनल क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सर्टिफिकेट (NCIC) ची संबंधित रेग्युलर किंवा आरपीएल आवृत्ती आवश्यक पात्रता म्हणून नमूद करण्यात आली आहे.
ही पदे तात्पुरत्या स्वरूपाची असून 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास 100 रुपयांच्या बॉण्डवर विहित नमुन्यात सेवा करारनामा करून द्यावा लागणार आहे.
विभागाकडून विहित मार्गाने नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी नियुक्ती रद्द करण्यात येईल. तसेच उमेदवाराची रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. पदे भरणे किंवा न भरणे तसेच पदांची संख्या कमी-अधिक करण्याचा अधिकार संस्था व्यवस्थापन समितीने राखून ठेवला आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज (बायोडाटा), शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांच्या स्वाक्षांकित दोन प्रती तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो यांसह 10 ऑगस्ट 2026 पर्यंत अध्यक्ष तथा सचिव, संस्था व्यवस्थापन समिती, स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमतनगर, जिल्हा हिंगोली येथे अर्ज सादर करावेत.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. पात्र उमेदवारांना 11 ऑगस्ट 2026 रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमतनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis