सोफी संत इब्राहिम साहेब यांचे सुपुत्र आरेफ बाबा यांचे हृदयविकाराने निधन
बीड, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी आणि मरहूम सोफी संत इब्राहिम साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र आरेफ इब्राहिम ऊर्फ आरेफ बाबा यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. या अनपेक्षित आणि क्लेशदायक घटनेने कु
आरेफ बाबा यांचे निधन


बीड, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी आणि मरहूम सोफी संत इब्राहिम साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र आरेफ इब्राहिम ऊर्फ आरेफ बाबा यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. या अनपेक्षित आणि क्लेशदायक घटनेने कुटुंबासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरेफ बाबा यांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. त्यामुळे त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande