अमरावती आयुक्तांच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न; सतर्क राहण्याचे आवाहन
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती महानगरपालिका आयुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीकडून नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी +66624278100 या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर केला जात असल्याची माहिती समोर
अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)

अमरावती महानगरपालिका आयुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीकडून नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी +66624278100 या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आयुक्तांच्या नावाने कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून आर्थिक मदतीची अथवा पैशांची मागणी केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे संदेश किंवा कॉल प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नयेत.तसेच +66624278100 किंवा अशाच प्रकारच्या इतर कोणत्याही संशयास्पद क्रमांकावरून आयुक्तांच्या नावाने संदेश आल्यास त्वरित सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, संशयास्पद संदेशांची खातरजमा करावी आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande