
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। पुरस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढते, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी व्यक्त केले एका कार्यक्रमात बोलताना लोढा यांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला.
पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी सांगितले की, वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल माध्यमातून घेतली जाते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन असून, त्यामुळे काम करण्याची ऊर्जा द्विगुणित होते. पुरस्कार प्राप्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी. तसेच पुरस्कार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी निराश न होता अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis