अमरावतीत काँग्रेसचा ‘कमी पदाधिकारी, जास्त जबाबदारी’ फॉर्म्युला
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) | जिल्हा काँग्रेस कमिटीने नेहमीच्या ‘जम्बो कार्यकारिणी’च्या परंपरेला फाटा देत मर्यादित, पण सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर केली आहे. कमी संख्येतील पदाधिकाऱ्यांवर निश्चित जबाबदाऱ्या सोपवून संघटना अधिक प्रभावीपणे चालविण्याचा
काँग्रेसचा ‘कमी पदाधिकारी, जास्त जबाबदारी’ फॉर्म्युला


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) | जिल्हा काँग्रेस कमिटीने नेहमीच्या ‘जम्बो कार्यकारिणी’च्या परंपरेला फाटा देत मर्यादित, पण सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर केली आहे. कमी संख्येतील पदाधिकाऱ्यांवर निश्चित जबाबदाऱ्या सोपवून संघटना अधिक प्रभावीपणे चालविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

नव्या कार्यकारिणीत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार इतर मागासवर्गीय २४, अल्पसंख्याक ७, अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती ५, खुला प्रवर्ग ७ आणि व्ही. जे.-एन. टी. प्रवर्ग ७ अशा स्वरूपात पदाधिकार्!यांचा समावेश करण्यात आला आहे. छोट्या समाजघटकांचाही विचार करून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला. कायम निमंत्रित पदाधिकाऱ्यांमध्ये खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, गटनेते तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे विद्यमान नगराध्यक्ष आणि गटनेत्यांचाही समावेश आहे. मर्यादित कार्यकारिणीमुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होणार असून संघटनात्मक कामकाजात अधिक गतिमानता येईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande