
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागासाठी राज्य मंत्रिमंडळात 16 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेल्या निर्णयांसह मराठवाडा वॉटर ग्रीड आणि विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीबाबत माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनीचर्चा केली.बैठकीत प्रकल्पनिहाय व जिल्हानिहाय प्रगती, निधी वितरण व खर्च, पूर्ण व सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, अडचणी व त्यावरील उपाययोजना, तसेच पुढील कालावधीतील नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
जायकवाडी प्रकल्प, शिवना-टाकळी प्रकल्प, नांदूर मध्यमेश्वर कालवा, शनिदेव उच्चपातळी बंधारा, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (आठवा टप्पा) तसेच पूरनियंत्रण उपाययोजना यांचाही सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना आमदार दानवे यांनी केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis