अमरावतीत श्वान नसबंदी करणाऱ्या संस्थेचे ४८ लाखांचे देयक रखडल्याने लसीकरण ठप्प
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) | शहरात मोकाट श्वानांची नसबंदी करणाऱ्या संस्थेचे देयक रखडल्यामुळे मार्चपासून श्वानांची नसबंदी, लसीकरण ठप्प असून शहरातील श्वानांची संख्या सध्या अनियंत्रितपणे वाढत आहे. नसबंदी करणाऱ्या संस्थेचे ४८ लाखांचे देयक रखडले असून त्
संस्थेचे ४८ लाख रुपयांचे देयकच रखडल्याने श्वानांची नसबंदी ठप्प


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) | शहरात मोकाट श्वानांची नसबंदी करणाऱ्या संस्थेचे देयक रखडल्यामुळे मार्चपासून श्वानांची नसबंदी, लसीकरण ठप्प असून शहरातील श्वानांची संख्या सध्या अनियंत्रितपणे वाढत आहे. नसबंदी करणाऱ्या संस्थेचे ४८ लाखांचे देयक रखडले असून त्याला मनपाच्या स्थायी समितीनेही या प्रकरणी ऑडिटवर देयक स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते.

शहरात मोकाट श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य जेरिस आले आहेत.शहरात हजारो श्वान असताना ४ वर्षांत प्रत्येकी १ हजार श्वान यानुसार ४ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली होती. अशी, माहिती पशु वैद्यकीय विभागाने सभागृहात दिली होती. अजुनही मनपाकडे ना शेल्टर हाऊस आहे, ना मोकाट श्वान पकडण्यासाठी परिणामकारक योजना. त्यामुळे या प्रकरणी कोणताही प्रभावी उपाय झाला नाही. तसेच श्वानांची नसबंदी व अॅण्टी रॅबिज फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लसीकरण निविदा प्रक्रियेलाही त्यामुळे अजुनही अमरावती मध्ये श्वानांची नसबंदी ठप्प आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande