बीड - कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नशा मुक्तीची शपथ
बीड, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत यूवा कनेक्ट २.0 अंतर्गत नशा मुक्त भारत या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांना ए
नशा मुक्ती अभिया


बीड, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत यूवा कनेक्ट २.0 अंतर्गत नशा मुक्त भारत या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांना एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विवेकानंद कवडे यांनी शपथ दिली.

विकसित भारत यूवा कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे कोश्याध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा. डॉ. देशपांडे , प्रा डॉ गुट्टे , प्रा. डॉ. चव्हाण , प्रा. डॉ. दिग्रसकर , प्रा. डॉ. कुलकर्णी , राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद कवडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande