शिरसाळा योजनांच्या प्रलंबित लाभासाठी मजूर युनियनचे परळी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शिरसाळा येथील शासकीय योजनांतील लाभार्थी च्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियनच्या वतीने परळी उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. लाभा
धरणे आंदोलन


बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शिरसाळा येथील शासकीय योजनांतील लाभार्थी च्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियनच्या वतीने परळी उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लाभार्थ्यांचा हप्ता तात्काळ बँक खात्यात वर्ग करावा. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे बंद झालेले मानधन तात्काळ सुरू करावे, वर्धापकाळ, श्रावणबाळ, दिव्यांग, संजय गांधी योजना तील लाभार्थ्यांचे चार महिन्यापासून प्रलंबित असलेले पेन्शन तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. शिरसाळा येथील घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 मधील रोजगार हमी योजनेची प्रलंबित मजुरी तात्काळ संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन च्या वतीने परळी उपविभागीय कार्यालय समोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

परळी येथील उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर साहेब यांनी येत्या आठ दिवसात बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन स्थगित केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ सुदाम शिंदे, कॉ प्रकाश उजगरे कॉम्रेड भगवानराव भगवान बडे यांच्यासह 100 पेक्षा जास्त लाभार्थी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनाला माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, कॉ पी एस घाडगे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande