व्यक्तीगत मोठी हानी; वडिलकीचा मार्गदर्शक हात हरवला- पंकजा मुंडे
बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.) । शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीप्रत व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले.
डॉ डी. वाय . पाटील


बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.) । शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीप्रत व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने आमची व्यक्तीगत खुप मोठी हानी झाली असुन आमचा वडिलकीचा मार्गदर्शक हात हरवला अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. डी.वाय. पाटील हे आमच्यासाठी कुटुंबातील जेष्ठ मार्गदर्शक होते. मुंडेसाहेबांशी त्यांचा असलेला स्नेह व आम्हाला सातत्याने वडिलकीचा आधार देणारे असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत निर्माण केलेल्या व्यवस्था हे आदर्शवत आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यभारही समर्थपणे सांभाळला.

शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.आमचे कुटुंब व व्यक्तीगत पातळीवर मोठी हानी झाली असुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पाटील कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती इश्वराने द्यावी अशी प्रार्थना पंकजाताई मुंडे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande