लातूरमध्ये भूजल माहिती व जलभृत नकाशांकनावर कार्यशाळा
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : केंद्रीय भूजल बोर्डाने भूजल माहितीच्या प्रसारासाठी विकसित केलेल्या डेटा पोर्टल्सचा जिल्हास्तरीय नियोजन, जलसंपदा व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासाठी संबंधित विभागांनी प्रभावी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमर
अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर


लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : केंद्रीय भूजल बोर्डाने भूजल माहितीच्या प्रसारासाठी विकसित केलेल्या डेटा पोर्टल्सचा जिल्हास्तरीय नियोजन, जलसंपदा व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासाठी संबंधित विभागांनी प्रभावी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केले.

केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी), मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे “सीजीडब्ल्यूबीच्या भूजल माहितीचा तसेच जलभृत (Aquifer) नकाशांकन अभ्यासांचा प्रसार व उपयोग” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिल्पा करमरकर होत्या.

कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, पाणलोट विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभाग यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी केंद्रीय भूजल बोर्डाचे वैज्ञानिक हितेश रामटेके यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (भूजलशास्त्र) उज्ज्वल कुमार यांनी राष्ट्रीय जलभृत नकाशांकन व व्यवस्थापन (NAQUIM) अंतर्गत लातूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या अभ्यासाची आणि त्यातील निष्कर्षांची माहिती सादर केली.

यावेळी हितेश रामटेके यांनी केंद्रीय भूजल बोर्डाने विकसित केलेल्या ग्राऊंड वॉटर डेटा डाउनलोड पोर्टल तसेच INGRESसह विविध ऑनलाइन डेटा पोर्टल्सची माहिती दिली. भूजलविषयक माहितीचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी लातूर जिल्हा भूजल मूल्यांकन अहवाल आणि त्याच्या उपयोगाबाबत माहिती दिली. कार्यशाळेदरम्यान “राष्ट्रीय जलभृत नकाशांकन व व्यवस्थापन अहवाल - लातूर जिल्हा” या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यशाळेचा समारोप वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (भूजलशास्त्र) उज्ज्वल कुमार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande