सातारा-देवळाई पाणीपुरवठा योजनेची रखडलेली कामे अंतिम टप्प्यात
आगामी १५ ते २० दिवसांत नियमित पाणीपुरवठ्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सातारा-देवळाई परिसरातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार
अ


आगामी १५ ते २० दिवसांत नियमित पाणीपुरवठ्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सातारा-देवळाई परिसरातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. मुख्य जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य जलवाहिनीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन जोडण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून, कंत्राटदाराने त्याबाबत आश्वासन दिले आहे. तसेच बीड बायपास क्रॉसिंगचे कामही एक-दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर अमीरनगर, एजीपी शाळेजवळील परिसर, महाडा परिसर आणि आलोकनगर येथील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. या सर्व ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील १५ ते २० दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या पाहणीवेळी प्रभाग समितीच्या सभापती तथा नगरसेविका सविताताई कुलकर्णी, नगरसेवक पदमसिंग राजपूत यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी किशोर शितोळे यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू नये, हीच आमची भूमिका आहे. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.” पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande