महावितरणमधील २० हून अधिक तंत्रज्ञांचा राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश
परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.) : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत परभणी येथील महावितरणमधील विविध संघटनांशी संबंधित २० हून अधिक तंत्रज्ञांनी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना संघटनेत प्रवेश केला. आमदार डॉ. राहु
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश


परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.) : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत परभणी येथील महावितरणमधील विविध संघटनांशी संबंधित २० हून अधिक तंत्रज्ञांनी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना संघटनेत प्रवेश केला.

आमदार डॉ. राहुल पाटील हे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्याध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यावर विश्वास ठेवत विविध संघटनांमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संघटनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

परभणीत झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी नव्याने सहभागी झालेल्या सर्व तंत्रज्ञांचे स्वागत केले. वीज कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, तसेच त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर संघटना सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या तंत्रज्ञांनी प्रवेश केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. वीज कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी राजेश डुब्बे, दत्ता जाधव, संतोष लोखंडे, संतोष बर्वे, विशाल जाधव, प्रसाद सिंगणापूरकर, मुख्य संघटक जीवन मुगळीकर, रमाकांत गायकवाड, अभिजीत कुलकर्णी, के. डी. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande