सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा संताप; पृथ्वीराज चव्हाणांनी महिलांची माफी मागावी
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक
सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा संताप; पृथ्वीराज चव्हाणांनी महिलांची माफी मागावी


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या ट्विटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते अत्यंत नीच, लाजिरवाणे आणि स्त्री जातीचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका करत, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची भाषा इतक्या खालच्या पातळीवर घसरली आहे का? असा सवाल उपस्थित केला.राणा यांनी पुढे म्हटले की, एका कर्तृत्ववान महिलेचा अपमान करून काँग्रेसने आपली विकृत मानसिकता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. सार्वजनिक जीवनात महिलांविषयी सन्मानाची भाषा वापरणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यांना समाजात स्थान नसल्याचे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व महिलांची तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, विविध पक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande