छ. संभाजीनगर - रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहर मराठवाड्याच्या विविध रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांनी दोन तास कामबंद आंदोलन केले. यामुळे रुग्णालयात काम बंद पडले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आज या वे
छ. संभाजीनगर - रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहर मराठवाड्याच्या विविध रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांनी दोन तास कामबंद आंदोलन केले. यामुळे रुग्णालयात काम बंद पडले.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आज या वेळेत राज्यव्यापी दोन तासांचे कामबंद आंदोलन केले. सेवाप्रवेश नियम अंतिम करणे, रिक्त पदांची भरती आणि सुधारित आकृतीबंधास मंजुरी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या परिचारीकांनी. घोषणा दिल्या आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यावर त्यांनी भर दिला पूर्ण सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande