
लातूर, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असे प्रतिपादन अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथे केले. लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' अंतर्गत शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिर परिसरात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मा. उत्तमराव माने यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती अयोध्याताई केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे यांच्यासह आदी पदाधिकारी, अधिकारी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis