
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या 32 रोडरोमिओंवर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 110 व 117 अन्वये कारवाई केली. याशिवाय अवैध दारूविक्रीप्रकरणी 55 गुन्हे दाखल करून 57 आरोपींवर कारवाई करण्यात आली व 3.92 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला. तंबाखू विक्रीप्रकरणी 58 गुन्हे दाखल करून 19,647 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण 113 गुन्ह्यांत 147 आरोपींवर कारवाई करत 4.12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis