मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. सकाळी 9.30 वाजता पारनेर, को.प.बं.क्र. 1 ता. अंबड जि. जालना येथे बंधाऱ्याची प
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

सकाळी 9.30 वाजता पारनेर, को.प.बं.क्र. 1 ता. अंबड जि. जालना येथे बंधाऱ्याची पाहणी. सकाळी 10 वाजता घनसावंगीकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय राष्ट्रीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालनाकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयानुषंगाने आयोजित बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. सायंकाळी 6 वाजता शासकीय वाहनाने जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande