रत्नागिरी : परदेशातील करिअर आणि शिक्षणाच्या संधींवर डीजीके महाविद्यालयात परिसंवाद
रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन आणि परदेशातील करिअर संधी या विषयावर एक दिवसीय परिसंवाद
रत्नागिरी : परदेशातील करिअर आणि शिक्षणाच्या संधींवर डीजीके महाविद्यालयात परिसंवाद


रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन आणि परदेशातील करिअर संधी या विषयावर एक दिवसीय परिसंवाद पार पडला.

महाविद्यालयाच्या नाटेकर सभागृहामध्ये कार्यक्रम झाला. परिसंवादात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे, डी-सॉल्युशन्स प्रा. लि.चे संस्थापक व संचालक नितीन म्हात्रे आणि प्रवेश सल्लागार व करिअर समुपदेशक लीना शेळके, विद्यार्थी समुपदेशक दीपिका पांडे, प्र. प्राचार्य सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव आदी उपस्थित होते.

परदेशातील उच्च शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या विविध संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असणारी कौशल्ये याविषयी अत्यंत सखोल व मार्गदर्शक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मार्गदर्शनातून वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशातील पुढील शैक्षणिक व रोजगाराच्या संधींची, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १२ वीनंतर परदेशातील शिक्षणासाठी असणाऱ्या विविध पर्यायांची सखोल माहिती मिळाली. परिसंवादाचा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ घेता आला.

रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या जानकी घाटविलकर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक विनय बावदाने, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख हर्षदा लिंगायत तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मार्था कीर यांनी केले, आभार गौरी हळदवणेकर यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande