चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
मुंबई, 04 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक
चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता


मुंबई, 04 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी व सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांमधून या न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे एक पदासह २१ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शिपाई, पहारेकरी आणि सफाईगार या पदांसाठी चार मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे चांदवड व परिसरातील नागरिकांना वरिष्ठ स्तरावरील दिवाणी प्रकरणांसाठी दूरच्या न्यायालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. स्थानिक पातळीवर न्यायालयाची सुविधा उपलब्ध झाल्याने न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ आणि परिणामकारक होऊन नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande