जळगाव : शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा  व शहीद परिवार सन्मान सोहळा ९ ऑगस्ट रोजी
जळगाव, , 04 ऑगस्ट (हिं.स.)जिल्हा नियोजन सभागृह, जळगाव येथे जिल्ह्यातील शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा व शहीद परिवार सन्मान सोहळा ९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक परिवार, मा. सै. विधवा, माजी सैन
जळगाव : शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा  व शहीद परिवार सन्मान सोहळा ९ ऑगस्ट रोजी


जळगाव, , 04 ऑगस्ट (हिं.स.)जिल्हा नियोजन सभागृह, जळगाव येथे जिल्ह्यातील शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा व शहीद परिवार सन्मान सोहळा ९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक परिवार, मा. सै. विधवा, माजी सैनिक संघटना, एनसीसी कॅडेट्स व जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, कार्यक्रमास आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande