सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित – विवेक गायकवाड
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनामध्ये क्ष
सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित – विवेक गायकवाड


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनामध्ये क्षेत्रीय स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या चांगल्या कामाचे श्रेय शासनाला मिळते. काम करताना अनेक संकटे व अडचणी येतात; मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या अडचणींवर मात केल्यास यश निश्चित मिळते. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले विचार प्रगल्भ ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्याने आरटीएस तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत केलेली उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेनेही ‘सेवाकर्मी’ तसेच ‘आयगॉट’ अंतर्गत कर्मयोगी भारत पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande