डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद - आमदार विटेकर
परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अशा शब्दात आमदार राजेश विटेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोक संदेशात आमदार
डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद - आमदार विटेकर


परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अशा शब्दात आमदार राजेश विटेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोक संदेशात आमदार राजेश विटेकर म्हणाले की,शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. देशभरात शैक्षणिक संस्था, विद्यापीठे तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्ये जपत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी आणि समाजसेवक गमावला आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना माझ्या पाथरी विधानसभा संघातील सर्व जनतेच्या व आमच्या विटेकर कुटुंबीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करते...!

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande