कचरा संकलन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेची २८० नव्या वाहनांची भर
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेने२५० लहान घंटागाड्या आणि ३० कॉम्पॅक्टर गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णयघेतला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि दररोज वाढणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे विद
PMC news


पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)।

शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेने२५० लहान घंटागाड्या आणि ३० कॉम्पॅक्टर गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णयघेतला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि दररोज वाढणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे विद्यमान वाहनांची संख्या अपुरी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या ३७९तसेच भाडेतत्त्वावरील वाहनांसह एकूण ७७० घंटागाड्याकार्यरत आहेत. सुमारे ७० लाख लोकसंख्याअसलेल्या पुणे शहरात दररोज जवळपास२,८०० मेट्रिक टन कचरानिर्माण होतो. मात्र, उपलब्ध वाहनांची संख्या अपुरी असल्याने अनेक भागांत कचरा उचलण्यास विलंब होत असून काही ठिकाणी कचरा साचून राहण्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तप्रजित नायरयांनी कचरा संकलनासाठी अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला.

भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या वाहनांच्या खर्चामध्येचालक, इंधन आणि एका सहाय्यकाचा समावेशअसेल. तसेच संबंधित कंत्राटदाराला प्रत्येक वाहनाद्वारेदररोज किमान पाच फेऱ्याकरणे बंधनकारक राहणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या मते, नवीन वाहनांमुळे कचरा संकलन अधिक वेळेवर होईल, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande