पुणेकरांना दिलासा; शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)।पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने शहरातील लागू असलेली पाणीकपात पूर्णपणे रद्द केली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती देत, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्
Naval Kisahor ram


पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)।पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने शहरातील लागू असलेली पाणीकपात पूर्णपणे रद्द केली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती देत, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

आयुक्त राम यांच्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली असून, टेमघर धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लागू असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नव्या निर्णयानंतर शहरात नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन पाणीकपात रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. त्यानंतर महापालिकेने पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande