'मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार'- शहाजीबापू पाटील
सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी शिंदे सेनेकडे यावी आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनाच महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींची ताकद महायुतीच्या पातळीवर लावली जाईल, अशी ग्वाही शिंदे सेनेच
fgdf


सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी शिंदे सेनेकडे यावी आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनाच महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींची ताकद महायुतीच्या पातळीवर लावली जाईल, अशी ग्वाही शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिर येथे मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, शिक्षक दरबार, आदर्श पुरस्कार वितरण सोहळा आणि इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा प्रारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी शहाजीबापू पाटील म्हणाले, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, जुनी पेन्शन योजना, टप्पा वाढ यांसारखे महत्त्वाचे प्रश्न मंगेश चिवटे निश्चितपणे मार्गी लावतील. त्यामुळे त्यांना महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

कार्यक्रमात आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार आणि आदर्श समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील २५ शैक्षणिक संस्था तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि संस्थांचा उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा आणि संघटनात्मक एकजुटीचा संदेश देत मेळाव्याची सांगता झाली.

------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande