
चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्य अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपविणार
सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सोलापूर जिल्हा आरोग्य विभागात प्रशासकीय स्तरावर महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, जिल्हा लेखा व्यवस्थापक (डॅम) वैशाली थोरात यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या कामकाजासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व कायम राखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जाणार आहेत. या प्रकरणाकडे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड