सोलापूर महापालिकेकडून मालमत्ता कर भरण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
ऑनलाईन भरणाऱ्यांना ६ टक्के, रोख किंवा धनादेशाद्वारे भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सोलापूर महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून आणि त्
smc


ऑनलाईन भरणाऱ्यांना ६ टक्के, रोख किंवा धनादेशाद्वारे भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत

सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सोलापूर महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून आणि त्यानंतर ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. आता नागरिकांना आणखी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, करावरील सवलतींचा लाभही कायम ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या निर्णयानुसार, मागील थकबाकीसह मालमत्ता कर एकरकमी ऑनलाईन भरल्यास ६ टक्के, तर रोख किंवा धनादेशाद्वारे भरल्यास ५ टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३१ ऑगस्टपूर्वी कर भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने ६ एप्रिल रोजी मालमत्ता कराची बिले अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती. तसेच मिळकतधारकांना एसएमएसद्वारे कर बिलाची लिंक पाठविण्यात आली होती. काही भागांमध्ये छापील बिलांचे वितरण करण्यात आले असले, तरी एसआयआर कार्यक्रमामुळे सर्व मिळकतधारकांपर्यंत छापील बिले पोहोचविणे शक्य झालेले नाही.

त्यामुळे छापील बिलाची प्रतीक्षा न करता महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी फोनपे, गुगल पे तसेच इतर विविध डिजिटल पेमेंट गेटवेद्वारे कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande