कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत मानवी विचारशक्तीही जपा; डॉ. नटराजन यांचा संदेश
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.) कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर काळाची गरज असली, तरी मानवी विचारशक्ती आणि निर्णयक्षमतेवर त्याचे वर्चस्व होऊ देऊ नये, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध उद्योगपती तथा जीटीटी डेटा सोल्यूशन्स, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि 5F वर्ल्ड
कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत मानवी विचारशक्तीही जपा; डॉ. नटराजन यांचा संदेश


पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.) कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर काळाची गरज असली, तरी मानवी विचारशक्ती आणि निर्णयक्षमतेवर त्याचे वर्चस्व होऊ देऊ नये, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध उद्योगपती तथा जीटीटी डेटा सोल्यूशन्स, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि 5F वर्ल्डचे कार्यकारी अध्यक्ष व सह-प्रवर्तक डॉ. गणेश नटराजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (SSE) आणि सिंबायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (SSI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागत विद्यार्थी स्वागत समारंभ आणि वर्धापनदिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर न करणारा माणूस हा गुहेत राहणाऱ्या आदिमानवासारखा आहे. मात्र, स्वतःची मानवी बुद्धिमत्ता कधीही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वाधीन करू नका. भविष्यासाठी सकारात्मक ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवा, असे डॉ. नटराजन यांनी सांगितले.

यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संचालिका प्रा. ज्योती चंदीरामणी तसेच सिंबायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शर्वरी शुक्ला उपस्थित होत्या.

डॉ. नटराजन यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी संवाद, ऐकण्याची सवय आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याचे महत्त्व पटवून दिले. भविष्य त्यांचेच आहे, ज्यांनी माहिती, तिचे विश्लेषण आणि त्यातून मिळणाऱ्या आकलनावर प्रभुत्व मिळवले आहे, असे ते म्हणाले.

यशस्वी आयुष्यासाठीवेगवान, एकाग्र, लवचिक, मैत्रीपूर्ण आणि आनंदी राहा,हा मंत्र देत त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याचे आवाहन केले. स्वामी विवेकानंद यांच्याउठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,या प्रेरणादायी संदेशाचा उल्लेख करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande