वीटभट्ट्या, हॉटेल्सवर प्रशासनाची नजर बाल कामगारांविरोधात विशेष मोहीम राबविणार
यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.) यवतमाळ जिल्ह्यात बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. बालकामगार किंवा वेठबिगारी कामगार
वीटभट्ट्या, हॉटेल्सवर प्रशासनाची नजर बालकामगारांविरोधात विशेष मोहीम राबविणार


यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.)

यवतमाळ जिल्ह्यात बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. बालकामगार किंवा वेठबिगारी कामगार आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.

महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगार कायद्याची अंमलबजावणी, ई-श्रम नोंदणी तसेच कामगार कल्याणाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सरकारी कामगार अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी बालमजुरी रोखण्यासाठी तालुकास्तरीय पथकांनी अधिक सतर्क राहून नियमित तपासण्या कराव्यात, असे निर्देश दिले.

विशेषतः वीटभट्ट्या, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी. प्रलंबित ई-श्रम नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande