
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील उपविभागीय कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन देत उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला
राजकीय मतभेदांच्या नावाखाली महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणारी वक्तव्ये निषेधार्ह असून अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राजकीय संस्कृतीला धक्का आहे तसेच महिला सन्मानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही भाषा सहन केली जाणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis