बीड : परळी वैद्यनाथ येथे भाविकांसाठी आधुनिक भक्तनिवास लवकरच सेवेत!
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक भक्तनिवास इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, परळीचे आमदार आ. धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत
अ


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक भक्तनिवास इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, परळीचे आमदार आ. धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित कंत्राटदारास आवश्यक सूचना दिल्या.

भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करण्यात आली. परळीच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, मुख्याधिकारी पी. एन. निगळ, वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेशजी देशमुख तसेच अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande