राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या करंजाडी–विन्हेरे विभागाध्यक्षपदी अजय महाडिक
रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.) : महाड तालुक्यातील विण्हेरे-करंजाडी विभागातील उद्योजक अजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांची करंजाडी–विन्
Ajay Mahadik appointed as the Karanjadi-Vinhere Divisional President of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar).


रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.) : महाड तालुक्यातील विण्हेरे-करंजाडी विभागातील उद्योजक अजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांची करंजाडी–विन्हेरे विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सचिव हर्ष कांबळे आणि महाड तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अजय महाडिक यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना अजय महाडिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अपेक्षित विकासकामे होत नसल्याने तसेच माझ्यासोबत असलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नवीन राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सचिव हर्ष कांबळे आणि तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.महाड विधानसभा मतदारसंघात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटन अधिक बळकट करणे आणि तरुणांना सक्षम नेतृत्व देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला.अजय महाडिक यांच्या नियुक्तीनंतर महाड तालुक्यातील विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande