मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला
मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती,
मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला


मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचा पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ आणि पेपर दोन दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहेत. अभ्यासक्रम व निवड प्रक्रियेचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील.

जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना स्थायी किंवा कायमस्वरूपी निवासाच्या तपशीलानुसार जिल्हा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार असून, परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज प्रणालीतील उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील व ३० जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande