जनावरे चोरीच्या प्रयत्नानंतर संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील बागवान नगर परिसरात कारमधून जनावरे चोरी करून नेण्याचा प्रयत्न गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणी कारचालकासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन
जनावरे चोरीच्या प्रयत्नानंतर संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड


सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील बागवान नगर परिसरात कारमधून जनावरे चोरी करून नेण्याचा प्रयत्न गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणी कारचालकासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास बागवान नगर परिसरात एका कारमध्ये गीर जातीचे खोंड निर्दयीपणे कोंबून ठेवण्यात आले होते. कारजवळच एक देशी गाय गंभीर अवस्थेत पडलेली होती. घटनेची माहिती मिळताच गोरक्षक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जमलेल्या संतप्त नागरिकांनी संबंधित कारची तोडफोड केली.या प्रकरणी जयप्रकाश नारायण नगर येथील दीपक राजू चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, बागवान नगर परिसरातील त्यांच्या गोठ्यातील गीर जातीचे खोंड चोरी करून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दादाराव भोसले यांच्या देशी कालवडीला आणि खंडू कसबे यांच्या देशी गायीला नायलॉनच्या दोरीने बांधून जखमी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी कारचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या आरोपींपैकी एकजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande