केजला दिवाणी न्यायालयास मंजूरी ; पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील केज येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यास राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली, या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवे
पंकजा मुंडे


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील केज येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यास राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली, या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे अशी येथील जनतेची खूप दिवसांपासूनची मागणी होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली, त्यामुळे केजला लवकरच न्यायालय सुरू होईल. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे व त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस देखील विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे, या निर्णयाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांचे आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande