लातूर - शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाबाबत काँग्रेसचा चाकूरकर परिवाराच्या सूचनांना मान
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार, आज देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भाने लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे,
चाकूरकर परिवाराची काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट


लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार, आज देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भाने लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहलजी उटगे, सभागृह नेते विजयकुमारजी साबदे, स्थायी समिती सभापती सचिनजी बंडापल्ले, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर सर व माजी अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ॲड. किरण जाधव सर यांनी आज 'देवघर' या निवासस्थानी शैलेश पाटील चाकूरकर साहेबांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

चाकूरकर परिवारांच्या दिशानिर्देशांचे पालन लातूर शहर महानगरपालिका करेल असे महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी आश्वस्त केले. येत्या चार दिवसांमध्ये परिवारांच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande