
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन बीड विमानतळाच्या कामासंदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांनी सविस्तर चर्चा केली.
या सदर्भात खासदार सोनवणे म्हणाले, यावेळी बीड विमानतळासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून सर्व शासकीय मंजुरी तातडीने देण्यात याव्यात, सर्वेक्षणासह इतर प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत आणि विमानतळाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून बीड विमानतळ लवकरात लवकर सुरू करावा, अशी ठाम मागणी केली. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी बीड विमानतळ लवकर सुरू होणे ही काळाची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis