बीड जिल्हा कारागृहासंदर्भातील गंभीर तक्रारींबाबत खा. सोनवणे यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सविस्तर निवेदन
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेऊन बीड जिल्हा कारागृहासंदर्भात प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्र
अ


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेऊन बीड जिल्हा कारागृहासंदर्भात प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी, काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा दिल्या जात असल्याचे आरोप, तसेच कारागृहातील पारदर्शकता, निष्पक्षता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या गंभीर बाबी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाकडून तातडीने सविस्तर अहवाल मागविण्यात यावा आणि चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन अमित शाह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.बीड जिल्ह्यातील नागरिकांना पारदर्शक, निष्पक्ष आणि उत्तरदायी कारागृह प्रशासन मिळावे तसेच कायद्याचे राज्य अधिक बळकट व्हावे, यासाठी या विषयाचा शेवटपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आवाज उठवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande