
लातूर, ५ ऑगस्ट (हिं.स.) :धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य होण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारचे प्रवासी वाहन चालक पात्र आहेत. प्रवासी वाहन चालकांनी मोठ्या संख्येने या मंडळाचे सदस्यत्व घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) विनोद चव्हाण यांनी केले आहे.
टॅक्सी, कॅब, ॲप-आधारित वाहने (ओला, उबर), पर्यटन वाहने तसेच इतर सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे चालक या मंडळाचे सदस्य होऊ शकतात. मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या कल्याणासाठी विविध सुविधा व योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
सदस्यत्वाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ananddighekalyankarimandal.org येथे ऑनलाइन नोंदणी करूनही सदस्यत्व प्राप्त करता येईल, अशी माहिती आरटीओ विनोद चव्हाण यांनी दिली.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis