धोंडगे यांनी मन्याड खोऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। भाईंनी दीन-दलित, दुबळ्यांसाठी लढा दिला. मन्याड खोऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून उपेक्षितांना प्रवाहात आणले. डॉ. भाई केशवराव धोंडगे म्हणजे धगधगती क्रांतीची मशाल, असे प्रतिपादन अभिनेते एकनाथ मोरे यांनी केले. श्री शिवाजी
धोंडगे यांनी मन्याड खोऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली


नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

भाईंनी दीन-दलित, दुबळ्यांसाठी लढा दिला. मन्याड खोऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून उपेक्षितांना प्रवाहात आणले. डॉ. भाई केशवराव धोंडगे म्हणजे धगधगती क्रांतीची मशाल, असे प्रतिपादन अभिनेते एकनाथ मोरे यांनी केले.

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक, शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी

हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करातुला करून सत्कार करण्यात आला.

यावेळी मोरे बोलत होते. यावेळी प्रा. लीला आंबटवाड, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी प्राचार्य डॉ. सुभाष नागपुर्णे, डॉ. भगवानराव जाधव, प्रा. शंकरराव आंबटवाड, प्रा. सुभाष मुत्तेपवार उपस्थित होते. कार्यक्रमात प्रतीक्षा मुसळे, माहेरा बेगम खलील अहेमद, रोहिणी धडके, अनिकेत काळे यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक संभाजी उंद्रटवाड, मुख्याध्यापक मोहम्मद जमील, उपमुख्याध्यापक गजानन मोरे, उपप्राचार्य मनीष परिहार, कार्यालयीन अधीक्षक पंडित लाडेकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande