
• नशा मुक्त भारत अभियानाचा १८ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
नशा मुक्त भारत अभियानाच्या (NMBA) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये व शासकीय, अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
कर्मचारी व नागरिकांनी नशा मुक्ती मित्र नोंदणी https://nashamukt.dosje.gov.in/nasha-mukti-mitr या लिंकवरून करावी. केंद्र सरकारच्या https://nashamukt.dosje.gov.in/epledge या अधिकृत संकेतस्थळावरून 'e-Pledge' घेऊन अभियानात सक्रीय सहभागी होत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. व्यसनमुक्तीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक १४४४६ चा देखील प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis