अमरावती : अजित ब्रँडच्या ब्राउन ब्रेडमध्ये ९० टक्के मैदा आढळल्याने एफडीएकडून कारवाई
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)। ऑनलाइन ग्रॉसरी प्लॅटफॉर्म ''ब्लिंकेट''च्या माध्यमातून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या ब्राउन ब्रेडच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत धडक कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत ''अजित ब्रँड''च्या ब्
एफडीएची कारवाई ब्लिंकेट, अजित बेकरीविरुद्ध गुन्हा


अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)। ऑनलाइन ग्रॉसरी प्लॅटफॉर्म 'ब्लिंकेट'च्या माध्यमातून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या ब्राउन ब्रेडच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत धडक कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत 'अजित ब्रँड'च्या ब्राउन ब्रेडमध्ये तब्बल ९० टक्के मैद्याचे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार ब्राउन ब्रेडमध्ये गव्हाच्या पिठाचे निश्चित प्रमाण असणे अनिवार्य आहे. या प्रकरणी अमरावतीतील ब्लिंकेटची दोन केंद्रे आणि नागपूर येथील 'अजित बेकरी' विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा विभागाला ब्लिंकेटवरून विकल्या जाणाऱ्या या ब्रेडच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून या उत्पादनांची ऑर्डर दिली होती. प्राथमिक संशयाची पुष्टी झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ब्लिंकेट केंद्रांवर छापे मारले. तेथून अजित ब्रँड ब्राउन ब्रेडचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवून सुमारे ७५० रुपयांचा उर्वरित साठा जप्त केला. या कारवाईची माहिती मिळताच नागपूर एफडीएनेही चार ठिकाणी छापे मारून आवश्यक कागदपत्रे व नमुने जप्त केले.

तपासणी अहवालात धक्कादायक खुलासाजून २०२६ मध्ये प्राप्त झालेल्या प्रयोगशाळा अहवालानुसार, ब्रेडमध्ये ९० टक्के मैदा असल्याचे स्पष्ट झाले. आरोग्यासाठी फायदेशीर समजून 'ब्राउन ब्रेड' खरेदी करणाऱ्या ग्राहकांची या माध्यमातून मोठी फसवणूक केली जात होती.

प्रकरण न्यायालयात दाखलअन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ५२ आणि ६६ अन्वये हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात अ आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास प्रत्येक आरोपीला १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे आरोग्यासाठी पोषक समजून गव्हाच्या पिठापासून तयार केलेली ब्रेड खरेदी करणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एफडीएच्या या पावलामुळे ब्रँडेड नावाखाली नियमबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांना मोठा इशारा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande