रत्नागिरी : गवारेड्यांकडूनशेतकऱ्यांच्या भातपिकाची नासधूस
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे गवारेड्यांनी नुकसान केले आहे.सलग दोन गवारेड्यांनी लावणी केलेले भात खाऊन आणि तुडवून टाकले आहे. राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, अनंत पांचाळ,
गवारेड्यांनी केलेली भातशेतीची नासधूस


रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे गवारेड्यांनी नुकसान केले आहे.सलग दोन गवारेड्यांनी लावणी केलेले भात खाऊन आणि तुडवून टाकले आहे. राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, अनंत पांचाळ, शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे, सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे, प्रकाश जायगडे, महेश जायगडे, प्रकाश सुर्वे, महेंद्र लाखन या सर्व शेतकऱ्यांचे गवारेड्यांनी भाताचे नुकसान केले आहे.

भातलावणीच्या कालावधीमध्ये पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना पंपाच्या साहाय्याने भातशेतीची लावणी करावी लागली. हाताशी आलेली शेती गवारेड्यांनी खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.कृषी कर्मचारी अधूनमधून गावामध्ये येतात. त्यांच्याकडून नुकसानीची पाहणी केली जात नाही. तसेच शेतकऱ्यांना ते शेतीविषयी समाधानकारक सल्ला देत नाहीत त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.वन खात्याने गवारेड्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande