
बीड, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
अनिशा ग्लोबल स्कूल, जामगाव रोड, आष्टी येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला
जनरल मेडिसिन, हृदयरोग, नेत्ररोग, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग यांसह विविध वैद्यकीय विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत, असून रुग्णांना त्वरित वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचारासाठी आवश्यक सल्ला दिला जात आहे.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी अधिक सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis