डोंबिवलीत भाजयुमो पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त डिलिव्हरी बॉयसाठी मोफत पेट्रोल वाटप
डोंबिवली, 05 ऑगस्ट (हिं.स.)। भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळाच्या वतीने कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डिलिव्हरी बॉयंसाठी मोफत पेट्रोल वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. डोंबिवली पश्चिम येथील चिंचो
Ph01


डोंबिवली, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळाच्या वतीने कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डिलिव्हरी बॉयंसाठी मोफत पेट्रोल वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. डोंबिवली पश्चिम येथील चिंचोली पाडा, रागाई मंदिराजवळील एकवीरा पेट्रोल पंपावर विविध ई-कॉमर्स व घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

ऑनलाइन सेवांचा वाढता वापर लक्षात घेऊन नागरिकांपर्यंत अखंड सेवा पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांनी हा उपक्रम युवकांसाठी समाजसेवेची प्रेरणा असल्याचे सांगितले. डोंबिवली पश्चिम अध्यक्षा प्रिया संदीप जोशी यांनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणारा हा आदर्श उपक्रम असल्याचे नमूद केले. सरचिटणीस प्रशांत मधुकर पाटेकर यांनी कष्टकरी वर्गाला प्रत्यक्ष मदत करणारा हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम असल्याचे सांगितले, तर उपाध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी अनमोल म्हात्रे यांनी कोरोनाकाळापासून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविल्याचे अधोरेखित केले.

अनमोल वामन म्हात्रे यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविल्याचे सांगत, डिलिव्हरी बॉयंच्या दैनंदिन खर्चाला छोटासा हातभार लावण्याची भावना यामागे असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भोईर, डोंबिवली पश्चिम अध्यक्षा प्रिया संदीप जोशी, सरचिटणीस प्रशांत मधुकर पाटेकर, उपाध्यक्ष संदीप म्हात्रे, बर्वे मॅडम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande