रत्नागिरी : आदिशक्ती अभियानात गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । आदिशक्ती अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य संवर्धन, सामाजिक प्रबोधन आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामपंचाय
रत्नागिरी : आदिशक्ती अभियानात गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम


रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । आदिशक्ती अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य संवर्धन, सामाजिक प्रबोधन आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामपंचायतीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये महिला व मुलींच्या विकासासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये हुंडाबळी निर्मूलन, व्यसनमुक्ती जनजागृती, सामूहिक विवाह, मुलगी जन्माचे स्वागत, बालविवाह प्रतिबंध, शाळांमधून विविध स्पर्धांचे आयोजन, कौशल्य विकास उपक्रम, महिलांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन (HB) तपासणी तसेच पोषण व आरोग्यविषयक जनजागृती असे विविध उपक्रम घेण्यात आले.

महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या बाबींवर विशेष भर देत ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. गावातील महिला, मुली व ग्रामस्थांचा या सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच मुकेश विचारे, उपसरपंच सुप्रिया हातणकर, ग्रामसेविका वडर मॅडम, आदिशक्ती कमिटीच्या अध्यक्षा श्रेया प्रकाश शिंदे, सचिव सायली नवनाथ भोसले, सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, शाळा व हायस्कूलचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाची टीम, सीआरपी बचत गट अध्यक्ष तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकप्रतिनिधी व गावातील सामाजिक कार्यकर्ते व राजापूर पंचायत समिती, राजापूर पोलीस ठाणे यांचे सहकार्य लागले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande